Sunday, June 30, 2024
HomeनाशिकNashik News : शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या; मंत्री भुसेंचे...

Nashik News : शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या; मंत्री भुसेंचे कृषी विभागाला निर्देश

नाशिक | Nashik

- Advertisement -

जिल्ह्यात चांगला पाऊस (Rain) पडला असून, पेरणीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. बळीराजा सुखावला असून त्याने पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात बियाणे तसेच खतांचा तुटवडा जाणवू नये तसेच वाजवी दराने कुणीही बियाण्याची विक्री करू नये. यासाठी मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी कृषी विभागाला दिले आहेत.

हे देखील वाचा : Nashik News : ठाकरे गटाच्या संतप्त शिवसैनिकांचा महावितरण अधिकाऱ्यांना घेराव

जिल्ह्यात काही विभागात चढ्या दराने बियाणे विक्रिची तक्रारी प्राप्त झाल्या. एका वाणांचे रेट हे सर्वत्र एकच असावेत व ज्या त्या कंपन्यांनी आपआपले दर प्रसिद्ध करावे अशी मागणी शेतकरी (Farmer) वर्गाने केली आहे. यावर मंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार नाही, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना कृषी अधीक्षकांना केली.

हे देखील वाचा : नाशिकच्या विमानसेवेची भरारी; गत वर्षात अडीच लाख प्रवाशांनी घेतला लाभ

तसेच तालुका स्तरावरील कृषी विभागाच्या पथकाने सक्रिय होत कुठे शेतकऱ्यांची फसवणूक (Fraud) होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील दिले. यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाचे १६ भरारी पथके तयार केले असून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या ९८२२४४६६५५ या क्रमांकावर तक्रार करावी. तसेच पालकमंत्री कार्यालयाच्या ९४२२८४१२११ या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या