Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : मंत्री भुसेंचा अद्वय हिरेंना धक्का; मालेगाव कृउबा समितीवर पुन्हा 'दादा'...

Nashik News : मंत्री भुसेंचा अद्वय हिरेंना धक्का; मालेगाव कृउबा समितीवर पुन्हा ‘दादा’ गटाचा झेंडा

सभापतीपदी शेवाळे तर उपसभापतीपदी सोनजकर यांची बिनविरोध निवड

नाशिक | Nashik

मालेगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीची (Malegaon APMC) निवडणूक बिनविरोध पार पडली असून या निवडणुकीत मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांना जोरदार झटका दिला आहे. मालेगाव कृउबा समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे चंद्रकांत शेवाळे आणि उपसभापतीपदी अरुणा सोनजकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे मालेगाव बाजार समितीतील अद्वय हिरे यांची सत्ता संपुष्टात आली असून मंत्री भुसे यांचा या निवडणुकीत करिष्मा दिसून आला आहे.

- Advertisement -

मालेगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीची निवडणूकीत भुसे यांच्या विरोधात कडवा संघर्ष करत अद्वय हिरे यांनी १८ पैकी १४ जागा जिंकून आणत भुसेंना जोरदार धक्का दिला होता. तर दादा भुसे यांच्या गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भुसे गटाची बाजार समितीवरील सुमारे १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आली होती. मात्र, त्यानंतर आता भुसेंनी हिरेंना धक्का देत मालेगाव बाजार समितीत पुन्हा एकदा आपल्या गटाची सत्ता स्थापन केली आहे. निवडणुकीआधी अद्वय हिरेंचे सहा समर्थक दादा भुसेंच्या गोटात दाखल झाले होते. त्यानंतर हे संचालक दोन दिवसांच्या सहलीसाठी रवाना झाले होते. यानंतर आज सभापती आणि उपसभापतीपदाची (Chairman and Deputy Chairman) निवडणूक पार पडली.

YouTube video player

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांचे बाजार समितीतील सदस्यत्व (Membership) रद्द करण्यात आल्याचा निर्णय दिला होता. बाजार समितीच्या कार्यकाळात मासिक सर्वसाधारण सभांना गैरहजर असल्याने हिरे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता, यानंतर आता हिरेंची बाजार समितीतील सत्ता गेल्याने त्यांना दुसरा मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...