Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDhananjay Munde : "आमदार संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध..."; मंत्री मुंडेंचा...

Dhananjay Munde : “आमदार संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेचे संबंध…”; मंत्री मुंडेंचा पलटवार

अंजली दमानियांच्या आरोपांनाही सडेतोड प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचे नाव आले आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बीडमधील वाल्मिक कराडची दहशत आणि मंत्री धनंजय मुंडेंचे व त्यांच्या कुटुंबीयांचे वाल्मिक कराडशी (Walmik Karad) असलेले व्यक्तिगत संबंध, तसेच आर्थिक संबंधाचे पुरावे त्यांना दिले आहेत. यानंतर आता या सर्व प्रकरणावर मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना भाष्य करत विरोधकांवर पलटवार केला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना मुंडे म्हणाले की, “अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवारांची भेट घेऊन राजीनामा मागितला, त्यासंदर्भातील प्रश्नावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यावर उत्तर देतील आणि त्यांनीच द्यावे अशी माझी अपेक्षा”, असे त्यांनी म्हटले. तसेच दमानिया यांनी केलेल्या आरोपावर बोलताना मुंडे यांनी म्हटले की, “राखेसंदर्भात थर्मस पावर स्टेशनने केलेला तो कचरा आहे, तो कचरा साफ करायचे काम संबंधित स्टेशनचेआहे, असे सर्वोच्च न्यायालयाने २००६ च्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे, प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा निर्णय येतच नाही”, असे त्यांनी सांगितले.

संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेंचे संबंध

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याचे संबध असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलतांना मंत्री मुंडे म्हणाले की,”कदाचित संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे हे संपर्कात असतील, त्यांचे संबंध असतील. कृष्णाला काय झाले हे पोलिसांना माहिती असण्यापेक्षा क्षीरसागर यांना जास्त माहिती आहे. मागील एक महिन्यापासून बीडचे प्रकरण सुरू आहे, माध्यमांचा रुतबा, मान आता कमी होत चालला आहे. काय खरं, काय खोटं हे तपासणी केल्यानंतर माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे, ट्रायल चालली पाहिजे, असे म्हणत धनंजय मुंडेंनी माध्यमांनाही लक्ष्य केले. तसेच, ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांना फास्टट्रॅक कोर्टात नेले पाहिजे या भूमिकेवरुन माझ्यात कुठलाही बदल होणार नाही”, असेही मुंडे म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...