Friday, June 21, 2024
Homeमुख्य बातम्याAjit Pawar : "अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार"; 'या' बड्या नेत्याचे मोठे...

Ajit Pawar : “अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार”; ‘या’ बड्या नेत्याचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये ‘मुख्यमंत्री’ पदावरून रस्सीखेच सुरु आहे की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद लवकरच जाणार अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. तर कधी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) समर्थक अजितदादांचा भावी मुख्यमंत्री (CM) म्हणून फलक लावतांना पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे यात भाजप देखील मागे नसून नुकतेच महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा ‘नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन,’ अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अशातच आता अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम (Minister Dharmarao Baba Atram) यांनी “लवकरच अजितदादा मुख्यमंत्री होतील, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे”, असे विधान केले आहे. ते नागपूरात पत्रकारांशी बोलत होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

CM Eknath Shinde : फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

यावेळी बोलतांना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, ‘मी पुन्हा येईन…’ हे भारतीय जनता पक्षाने केलेले ट्विट त्यांनी नंतर डिलीट केले आहे. त्यामुळे त्यावर आता बोलण्यात काही अर्थ नाही, पण अजितदादा मुख्यमंत्री होतील, याची मला खात्री आहे. अजित पवार पुढील काळात महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. २०२४च्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत (Election) महायुतीमध्ये ९० जागा मागण्याचे आमचे ठरले आहे. पुढे ज्येष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि निर्णय काय होतो, हे बघावे लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमचे सरकार चांगले सुरू आहे. सध्या यात काहीही बदल होणार नाही. मात्र, पुढील मुख्यमंत्री अजितदादा व्हावे, अशी आमचा भूमिका आहे, असेही मंत्री आत्राम यांनी म्हटले.

‘मी पुन्हा येईन’वरून फडणवीसांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “पुन्हा यायचं असेल तर…”

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र भ्रमणावर निघाल्यानंतर अजित पवारांचा विदर्भात देखील दौरा होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. विदर्भात पक्ष वाढेल याचा विश्‍वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते बसून ठरवतील की, मुख्यमंत्री कोण होणार. तडफदारीने काम करणारा नेता म्हणून अजित पवारांकडे बघितले जाते. त्यांच्याकडे मोठा अनुभव असल्याने दादांना मुख्यमंत्री करावे, असे माझे मत आहे, असेही अत्राम यांनी सांगितले.

Nashik Crime News : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; सोलापूरात ड्रग्जचा कारखाना
उद्ध्वस्त, ‘इतक्या’ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

दरम्यान, नुकतेच भाजपच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) या सोशल मीडिया अकाऊंटवर देवेंद्र फडणवीसांचा ‘मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. तसेच शिंदे गटातील आमदारांवर (MLAs from Shinde Group)अपात्रतेची असणारी टांगती तलवार, महायुतीतील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा, अजित पवार नाराज असल्याची चर्चा, अजितदादांच्या आक्रमकतेची धार कमी करणे, भाजपच्या कार्यकर्त्यांना नवी उमेद देणे ही कारणे असण्याची चर्चा नाकारता येत नाही. त्यामुळे आता भाजपच्या या जुन्या व्हिडीओमुळे नवे प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी काय केलं? PM मोदींच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या