मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गुप्त भेटीने सुरू झालेला कल्लोळ थांबायचं नाब घेत नाही. आता या प्रकरणावर थेट अजित पवार गटाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया आली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे.
दोघांमध्ये काय चर्चा झाली आहे हे शरद पवार साहेबांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे बाकीचे कोण काय म्हणतात याला काही फार महत्व नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यावा, असा टोलाही वळसे पाटील यांनी लगावला.
कळव्यातील रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरुच; आजही ४ रुग्णांचा मृत्यू
नवाब मलिक यांना न्यायालयीन प्रक्रियेतून जामीन मिळाला आहे. त्यांना विश्रांती घेऊ दिली पाहीजे, ते शांतपणे आपला निर्णय घेतील. कोणत्या गटात जायचे, याचा निर्णय ते शांतपणे घेतील, असंही वळसे पाटील म्हणाले. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा संभ्रम संपला पाहीजे, अशी भुमिका घेतली आहे.