Monday, June 24, 2024
Homeनाशिकमंत्री गिरीश महाजनांनी घेतली छगन भुजबळांची भेट; नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार?

मंत्री गिरीश महाजनांनी घेतली छगन भुजबळांची भेट; नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार?

नाशिक | Nashik

- Advertisement -

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यासह उर्वरित टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र, अजूनही महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीचा काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. यात महायुतीचा नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) जागेचा देखील तिढा सुटलेला नसून या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. अशातच आज नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची त्यांच्या नाशिकमधील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये नाशिकच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महाजन यांनी नाशिक लोकसभेतून अपक्ष अर्ज भरलेले शांतिगिरी महाराज यांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे आज उशीरापर्यंत किंवा उद्या नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) हे देखील नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचे बोलले जात असून त्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या जागेसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज रात्री किंवा उद्यापर्यंत महायुतीचा नाशिकचा उमेदवार जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या