Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजGirish Mahajan : "...तर लोक त्यांना जोड्याने मारतील"; गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर...

Girish Mahajan : “…तर लोक त्यांना जोड्याने मारतील”; गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंवर पलटवार

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर लपून राहिलेले नाही. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच एकनाथ खडसे यांनी पत्रकार अनिल थत्ते यांच्या एका व्हायरल क्लिपचा धागा पकडत एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत (IAS Officer) गिरीश महाजन यांचे संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

- Advertisement -

यानंतर आता या आरोपावर मंत्री गिरीश महाजनांनी पलटवार केला आहे. महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या घरातील गोष्ट सांगितली तर लोकं त्यांना जोड्याने मारतील, असे म्हणत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, “मी जर एकनाथ खडसेंच्या घरातील (House) एका गोष्टीचा खुलासा केला तर त्यांना बाहेर आल्यावर लोक जोड्याने मारतील. पण मी ही गोष्ट बोलणार नाही. त्यामुळे त्यांनी मला बोलायला लावू नये”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “एकनाथ खडसे एक नंबरचे महाचोर असून त्यांना कमरेच्या खाली वार केल्याशिवाय दुसरं काहीही जमत नाही. माझ्यावरील आरोपांचा त्यांनी एक तरी पुरावा दाखवल्यास मी राजकारणातून (Politics) बाहेर पडेल. खडसे यांचं सगळं संपलेलं असून त्यांचे दुकान बंद झालेले आहे. त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात. महाराष्ट्राला मी काय आहे हे माहीत आहे”, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.

खडसे नेमकं काय म्हणाले होते?

गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते (Journalist Anil Thatte) यांनी एक क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटलंय की,गिरीश महाजन यांच्या रंगला रात्री अशा, त्यात त्यांनी सविस्तर सांगितले की, महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहे. त्या महिलेचे नाव देखील मला माहित आहे, मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी (Amit Shah) मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते. त्यावेळी अमित शहा यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले की तुझे एका महिला (Woman) आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहे. परंतु, महाजन यांनी त्यांना सांगितले की नाही. माझे कामानिमित्त बऱ्याचशा अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू असते. पण शहांनी त्यांना सांगितले की तुझे संपूर्ण कॉल रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. रात्री दीड वाजेनंतर तुझे शंभर शंभर कॉल त्या महिला अधिकाऱ्यासोबत झालेले आहेत. तुझे एवढ्या रात्री बोलायचे काय संबंध, सीडीआर खरं बोलतो असे काही प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले असल्याचे खडसे म्हणाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...