मुंबई l Mumbai
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे कडे सहकार व पणन खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वर ही माहिती देण्यात आली आहे.त्यात म्हंटले आहे की,सहकार व पणन मंत्री बाळसाहेब पाटील हे काही दिवसांसाठी वैद्यकीय कारणास्तव उपलब्ध नसतील. या काळात त्यांचा कार्यभार जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांच्या अनुपस्थित सहकार व पणन खात्याची जबाबदारी जयंतराव पाटील सांभाळतील.
खा. शरद पवार यांची मंत्र्यांना सूचना…
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्य मंत्री मंडळातील पक्षाच्या मंत्र्यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० पासून वेळ देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे असे ही राष्ट्रवादी तर्फे सांगण्यात आले आहे.