Thursday, June 20, 2024
Homeजळगावमंत्री महाजन म्हणतात स्वबळाचा गोळीबार करण्यापेक्षा पक्षाची ताकद वाढवा

मंत्री महाजन म्हणतात स्वबळाचा गोळीबार करण्यापेक्षा पक्षाची ताकद वाढवा

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

- Advertisement -

राज्यात 105 आमदार असताना भाजपाला विरोधात बसावे लागले होते. शिंदे गटाचे 40 आमदार सोबत आल्यामुळे राज्यात भाजपा सत्तेत आहे. त्यामुळे जो पॅटर्न राज्यात आहे तोच जिल्ह्यातही राबविल्यास संपूर्ण 12 बाजार समित्यांवर युतीची सत्ता येईल. स्वबळाचा नारा (independence) देवून हवेत गोळीबार करण्यापेक्षा त्या तालुक्यांमध्ये आधी पक्षाची ताकद (Increase party strength)वाढवा त्यानंतरच स्वबळाचा नारा द्या अशा शब्दात भाजपाचे मंत्री गिरीश महाजन (BJP Minister Girish Mahaja)यांनी भाजप कार्यकर्त्यांना बैठकीत कानपिचक्या दिल्या.

जिल्ह्यातील 12 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाविकास आघाडीने या निवडणुका संयुक्तपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने मात्र स्वबळाचा नारा दिला आहे. सोमवारी शहरातील बालाणी लॉन येथे भाजपाची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन हे होते. या बैठकीत खासदार उन्मेष पाटील, जिल्हाप्रमुख सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, संजय सावकारे, माजी आमदार स्मिता वाघ, भाजप महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे सर्व तालुकाप्रमुख व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदे गटावर कार्यकर्त्यांची नाराजी

राज्यात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार असले तरी जळगाव जिल्ह्यात मात्र चित्र वेगळे आहे. शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार भाजपाच्या कार्यकर्त्यांची कामे होऊ देत नसल्याचे सांगत शिंदे गटाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच भाजपाचेच प्रमुख पदाधिकारी सक्रीय कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याची नाराजी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर काटे यांनी बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका भाजपाने स्वबळावर लढाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

मंत्री महाजनांकडून युतीचे संकेत

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडलेल्या व्यथा लक्षात घेता मंत्री ना. गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राज्यात शिंदे गटामुळेच भाजपा सत्तेत असल्याची आठवण त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. तसेच स्वबळाचा नारा देऊन हवेत गोळीबार करण्यापेक्षा ज्याठिकाणी भाजपाची ताकद कमी आहे अशा ठिकाणी ताकद वाढविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

शिवसेनेचे मंत्री भाजपाच्या कार्यकर्त्यांना वेळ देत नाही, त्याप्रमाणे जामनेरातही मी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वेळ देऊ शकत नाही. मात्र याचा अर्थ आपला विरोध आहे असे नसल्याचे ना. महाजन यांनी स्पष्ट केले. जे राज्यात आहे, तेच जिल्ह्यात कायम ठेवून, बाजार समितीच्या निवडणुकांसह आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील भाजपच्या नेत्यांकडून शिवसेना शिंदेगटासोबत युती करण्याचे संकेत ना. गिरीश महाजन यांनी दिले.

नेत्यांचा निर्णय अन् कार्यकर्त्यांचा हिरमोड

भाजपाच्या जिल्हा बैठकीत कार्यकर्त्यांनी शिंदे गट आणि पालकमंत्र्यांविरूध्द चांगलीच आगपाखड केली. मात्र ना. महाजनांच्या

सल्ल्यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या