ओझे |विलास ढाकणे
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती स्थिर असल्याने नागरिकांनी काळजी करू नये असे आव्हाहन युवानेते गोकुळ झिरवाळ यांनी केले आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती मागील आठवड्यात बिघडली होती. त्याना उपचारासाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. झिरवाळ हे गेल्या काही दिवसांपासून किडनी स्टोनच्या आजाराने त्रस्त असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, नामदार झिरवाळ यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे.
मतदार संघातील नागरिकांनी नरहरी झिरवाळ यांच्या आजाराबद्दल चिंता व्यक्त केली होती. परंतु त्यांची तब्येत अतिशय व्यवस्थित असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे याबाबत जनतेने काळजी करू नये व मतदार संघातील नियमित कामकाज सुरूच राहणार असल्याचे गोकुळ झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले