नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात मोठा काळ घालवला आहे. नितीन गडकरी हे मूळ नागपूरचे असून ते भाजपाचे केंद्रीय मंत्री आहे. ते आपल्या सडेतोड भाषणांसाठी ख्याती आहे. यावेळी निमित्त होते ते म्हणजे बॉलीवुडची प्रसिध्द दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान सोबतच्या गप्पांचे. फराह खान ही सध्या तिच्या व्हिब्लॉगसाठी चर्चेत आहे. तिने नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भेट दिली. फराह खान कूक दिलीपसोबत गडकरी यांच्या दिल्लीतील निवास स्थानी गेली होती. तिथे नितीन गडकरी यांनी त्यांच्या विविध योजना आणि सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली.
फराह खानने पहिल्यांदाच राजकीय व्यक्तीसोबत ब्लॉग शुट केला. या ब्लॉग दरम्यान फराह खानने नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी सोबत मनसोक्त गप्पा मारल्या. सोबतच खाद्यपदार्थही बनवले. फराह खान दिल्लीत येत असल्याने नितीन गडकरी यांच्या पत्नीही फराह खानला भेटण्यासाठी नागपूरहून दिल्लीत दाखल झाल्या. या ब्लॉगच्या निमित्ताने फराह खानसोबतच गडकरींच्या चाहत्यांना त्यांचे निवासस्थान पाहण्याची संधी मिळाली.
IPL 2026: BCCI चा मोठा निर्णय! मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त करण्याचे केकेआरला दिले निर्देश
फराह खानचे प्रश्न आणि गडकरींचे उत्तर
फराह खानने नितीन गडकरी यांना व्हीलॉग शूटदरम्यान, विविध क्षेत्राच्या निगडीत प्रश्न विचारले. फराह खानने नितीन गडकरींना विचारले की, त्यांच्याकडे चित्रपट पाहण्यासाठी वेळ आहे का? गडकरींनी तेव्हा होकारार्थी उत्तर दिले. त्यांच्या घरी थिएटर आहे. त्यानंतर फराह खानने नितीन गडकरींना विचारले की, त्यांनी ‘ओम शांती ओम’ आणि ‘मैं हूं ना पाहिले आहे का?’ तेव्हा गडकरींनी हो असे उत्तर दिले. गडकरींच्या उत्तरेतून असे समजते की, त्यांना चित्रपट पाहण्याची नक्कीच आवड असेल.
गडकरींची आवडती अभिनेत्री कोण?
त्यानंतर फराह खानने नितीन गडकरींना विचारले की, तुमचा आवडता अभिनेता / कलाकार कोण आहे? तेव्हा नितीन गडकरींनी अभिनेता अमिताभ बच्चनचा उल्लेख केला. फराह खानने त्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारले, तेव्हा नितीन गडकरींनी, रजनीगंधामधील अभिनेत्री विद्या सिन्हा असे उत्तर दिले. नितीन गडकरींना विद्या सिन्हा ही अभिनेत्री आवडत असल्याचे सांगितले. दरम्यान, विद्या सिन्हा ही अभिनेत्री हयात नाही. १५ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे निधन झाले होते. यावर फराह खान म्हणाली की, बहुतेक आहे.. नितीन गडकरी म्हणाले नाही नाही… मला स्मृति ईरानीने सांगितले होते नाहीये म्हणून.. विद्या सिन्हा यांनी छोटी सी बात, पती पत्नी और वो अशा काही चित्रपटात काम केले.




