Saturday, July 27, 2024
Homeनगरकाही कळायच्या आत शेतीचं लय वाटोळ झालं बघा साहेब...

काही कळायच्या आत शेतीचं लय वाटोळ झालं बघा साहेब…

करंजी (प्रतिनिधी)

आधी पाऊस नव्हता म्हणून पीक वाया गेली. राहिली सायली होती ती थोड्याफार पाण्यावर जगवली..पण काही कळायच्या आत धो धो पाऊस झाला अन तीपण पावसाच्या वाहून गेली.. साहेब आमच्या शेतीचं लयं वाटोळंं झालं बघा.. अशा व्यथा पाथर्डी तालुक्यातील मांडवे शिरापूर, तिसगाव, त्रिभुवनवाडी घाटशिरस, शिराळ या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी पोटतिडकीने मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Relief and Rehabilitation Prajakta Tanpure) यांच्यासमोर मांडल्या.

- Advertisement -

या संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघाचे लोक प्रतिनिधी व राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या सर्व नुकसानग्रस्त भागाचा शुक्रवारी दौरा केला. मी नुकसानीची पाहणी करायला आलोय तुम्हाला भरपाई मिळवून देणारच. मात्र तुम्ही धीर खचून देऊ नका या शब्दात हताश झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर देण्याचे काम मंत्री तनपुरे यांनी या पहाणी दौर्‍याच्या माध्यमातून केले. जर कृषी कर्मचारी कामगार तलाठी पंचनामे करण्यासाठी आले नाहीत तर तात्काळ माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन मंत्री तनपुरे यांनी केले.

ज्या ठिकाणी आधिकच्या पाण्यामुळे बंधार्‍या जवळील शेतकर्‍यांच्या जमिनी वाहून गेल्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत टिकॅल टाकून तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर ज्या शेतकर्‍यांच्या शेळ्या कोंबड्या व इतर पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे त्यांना देखील मदत करण्याची ग्वाही तनपुरे यांनी यावेळी दिली.

यावेळी माजी सभापती संभाजी पालवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेना नेते राजेंद्र म्हस्के, माजी जि प अध्यक्ष बाबासाहेब भिटे, युवा सेना तालुका अध्यक्ष अनिल रांधवणे, उपतालुकाप्रमुख भारत वाढेकर, सरपंच राजेंद्र लवांडे, रवींद्र मुळे, राजेंद्र पाठक,पांडुरंग शिदोरे, सतीश लोमटे, गणेश पालवे, सुनील पुंड, चेअरमन शरद पडोळे, किसन पाठक, उपसरपंच गणेश शिंदे, युवानेते महेश लवांडे, बाबा बुधवंत, अविनाश कारखेले, भाऊसाहेब लवांडे, मधुकर लवांडे आदी उपस्थित होते.

माझ्यापेक्षा शेतकरी महत्वाचा …

राज्य मंत्र्यांच्या दौर्‍यासाठी प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका कृषी अधिकारी शिंदे हे मांडवे येथे हजर झाले होते. मात्र माझ्यापेक्षा शेतकरी महत्वाचा आहे. माझ्यासोबत न थांबता तात्काळ शेतकर्‍याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू करा, एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यात पासून वंचित राहता कामा नये. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाची मदत मिळाली पाहिजे या सकारात्मक हेतूने कामाला लागा. अशा स्पष्ट सूचना देत मंत्री तनपुरे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना मार्गस्थ केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या