अहमदनगर | Ahmednagar
राज्याचे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत स्वतः माहिती दिली. त्यांनी म्हंटले आहे की,
“सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार.”
तनपुरे करोना काळात आपल्या मतदारसंघात, जिल्ह्यात आणि राज्यातही दौरे करीत होते. त्यांच्या उपस्थिती विविध उपक्रम, बैठका पार पडल्या. मतदारसंघासोबतच नगर शहरातही ते सक्रिय होते. अंतिम वर्ष परीक्षा विषयात त्यांनी सुरुवातीपासून लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ऐन अधिवेशानाच्या वेळी त्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने त्यांना अधिवेशनात भाग घेता आला नाही. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. सर्वप्रथम गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अस्लम शेख यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांनीच करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.