Thursday, February 5, 2026
HomeनगरRahata : राहुल गांधींकडून मतदारांचा अपमान : ना. विखे पाटील

Rahata : राहुल गांधींकडून मतदारांचा अपमान : ना. विखे पाटील

लोणी |वार्ताहर| Loni

कॉग्रेस नेते राहूल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांचा सर्वाधिक वेळ परदेशात जात असल्याने, देशातील राजकीय परीस्थीती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी लगावला. निवडणुक प्रक्रीये विरोधातील त्यांची विधान म्हणजे मतदारांचा अपमान असल्याची प्रतिक्रीया माध्यमांशी बोलतांना त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

कॉग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले, केवळ निवडणूक (Election) प्रक्रीयेला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत कॉगेस पक्ष जेमतेत चाळीस जागांपर्यत मजल मारू शकला होता. यंदा चाळीसच्या शंभर झाल्या मग ते फिक्सिंग होत का आंध्र (Andhra Pradesh) आणि हिमाचल (Himachal Pradesh) राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार आले ते सुध्दा फिक्सिंगमुळे आले का या प्रश्नांची उतर सुध्दा राहूल गांधीनी दिली पाहीजेत. निवडणूक प्रक्रीये विरोधात विधान करून राहूल गांधी स्वताची बदनामी करून घेत आहेत. लोकसभेची निवडणूक खोटे नॅरेटिव्ह पसरवून केली गेली. काही ठिकाणी त्याचा परीणाम पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीची राजकीय परीस्थीती मात्र वेगळी होती. महायुतीला राज्यातील मतदारांनी कौल दिला. मात्र मतदारांचा सातत्याने अपमान करण्याचे काम राहूल गांधी यांच्याकडून होत आहे. त्यांनी देशात वेळ दिला तर, राजकीय परीस्थीतीची माहीती होईल.

YouTube video player

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) आणि खा.सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राहूल गांधीच्या वक्तव्याच्या केलेल्या समर्थनाची खिल्ली उडवून विखे पाटील म्हणाले, त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल. खा.सुप्रिया सुळे यांना स्वताचे कोणतेच मत राहीलेले नाही. लोकसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकाला ते कधी पाठींबा देतात, कधी चर्चेच्या वेळी गैरहजर राहाता. त्यांचे पिताश्री मोदीचे कौतुक करतात याकडे लक्ष वेधून त्यांनी खरच एकदा निर्णय घेतला पाहीजे की, आघाडीसोबत राहायचे की मोदींच्या बरोबर काम करायचे. त्यांच्या पक्षातील लोकांचा सुध्दा त्यांच्यावर विश्वास राहीलेला नाही. उध्दव आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात फक्त महायुती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही (Local Government Elections) तेच चित्र पाहायला मिळेल. निवडणुका महायुती म्हणूनच आम्ही लढणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...