Friday, May 3, 2024
Homeनगरखुर्चीसाठी महाविकास आघाडीत जावून संधी साधली त्याचे काय?

खुर्चीसाठी महाविकास आघाडीत जावून संधी साधली त्याचे काय?

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Balasaheb Thackeray) यांच्या विचारांशी प्रतारणा करून खुर्चीसाठी मुलासह महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मंत्रीपद घेवून संधी साधली त्याचे काय? असा सवाल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केला आहे. मी म्हणजे शिवसेना हा शिमगा आता तरी बंद करा असा सल्ला त्यांनी दिला.

- Advertisement -

जिल्ह्यावर अवकाळीचे संकट

रत्नागिरी (Ratnagiri) येथील सभेत केलेल्या वक्तव्यांबाबत माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे योगदान देश कधीच विसरणार नाही. मात्र सत्तेसाठी हे हिंदुत्व उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दावणीला नेवून बांधले तेच आज भाजप मधील नेत्यांना संधीसाधू म्हणत आहेत. याचे आश्चर्य वाटते. भाजपाने कधीही स्व. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. मात्र तुम्ही त्यांच्या विचारांचे आदर्शच खुर्चीसाठी बदलून टाकल्याची टिका (Criticism) विखे पाटील यांनी केली.

नगरमधील तरूणाकडून 24 लाखांचे अमली पदार्थ जप्त

राज्यात बाळासाहेबांचा विचार पुढे घेवून जाणारे शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले आहे. जे जनतेच्या मनात होते तेच घडले असे स्पष्ट करून विखे पाटील म्हणाले की, कोणताही निकाल यांच्या बाजूने आला की संस्था चांगली आणि विरोधात गेला की शिमगा करायचा अशी पध्दत सध्या ठाकरे गटाने सुरू केली आहे. मात्र कशीतरी सत्याचा स्विकार करण्याची मानसिकता ठेवा. राज्यातील जनता सूज्ञ असल्याने येणार्‍या निवडणुकीत सेना भाजप सर्वत्र सत्तेवर दिसेल असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

नगर जिल्ह्यात नाफेड कांदा खरेदी करणार

- Advertisment -

ताज्या बातम्या