संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
माझ्यावर जास्त अवलंबून राहू नका हे जयंत पाटलांचे (Jayant Patil) विधान म्हणजे शरद पवारांना (Sharad Pawar) सूचक इशारा असून, त्यांनी आता सतर्क राहिले पाहिजे असा खोचक टोला जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी लगावला आहे. संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, समाजामध्ये संभ्रम आणि असंतोष होईल अशी विधाने होता कामा नये. आपल्याकडे इतके काम आहे, प्रभावी योजना आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला मोठ्या बहुमताने विजयी केल्याने यावर जर प्रभावी काम आपण केले तर चांगला संदेश जाईल असे व्यक्तिगत माझे मत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उतर देताना सांगितले.
मढी (Madhi) येथील वादाची सर्व माहिती आपण प्रशासनाकडून घेतली असून यामध्ये योग्य मार्ग काढण्याच्या दृष्टीने आमदारांशी संपर्कात असल्याचे ते म्हणाले. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलेले वक्तव्य विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नाही. त्यांनी केलेल्या सूचनांचा पक्षामध्ये आदरच असल्याचे त्यांनी सांगितले. तर संगमनेर नगरपालिकेतील बैठकीनंतर झालेल्या गोंधळाबाबत बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, गोंधळ घालणारे कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. याचा प्रभाव फारसा होत नाही.