Wednesday, May 29, 2024
Homeनगरना. विखे पाटील यांची लोकायुक्तबाबत अण्णा हजारे यांच्याशी चर्चा

ना. विखे पाटील यांची लोकायुक्तबाबत अण्णा हजारे यांच्याशी चर्चा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

लोकायुक्त विधेयकाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुचनांनुसार योग्य तो बदल करूनच ते विधानपरिषदेत मंजुर करण्यात येईल असे अश्वासन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजारे यांची राळेगण सिद्धी येथे भेट घेऊन चर्चा करताना दिले.

- Advertisement -

मंगळवारी (दि.) ना. विखे पाटील हे पारनेर तालुक्याचा दौर्यावर होते. त्यांनी करत जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे याची भेट घेण्यापुर्वी पारनेर तहसिल कार्यालय येथे महसुल सप्ताहाअंतर्गत नागरिकांच्या समस्या जाणुन घेत अधिकार्याना सुचना केल्या. संजय गांधी योजनेतील लाभार्थीना लाभा मंजुरीचे पत्राचे वाटप केले.

यानंतर राळेगण सिध्दी येथे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांची भेट घेतली. लोकयुक्त बिलाच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी आण्णा हजारे यांनी केलेल्या सूचनांबबात त्यांना आश्वासित केले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, पारनेरच्या तहसिलदार गायत्री सौंदाणे, नायब तहसिलदार तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या