Friday, November 22, 2024
Homeराजकीयभुजबळांनी शरद पवारांना भेटण्यात काही गैर नाही - मंत्री राधाकृष्ण विखे...

भुजबळांनी शरद पवारांना भेटण्यात काही गैर नाही – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रात राजकीय (Political) ध्रुवीकरण झाले आहे. पूर्वी अनेक राजकीय पक्ष एकत्र बसून चर्चा करीत होते. हल्ली सत्तारूढ पक्षाने विरोधकांशी बोलू नये असे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, समाजाच्या विकासाच्या उद्देशाने आवश्यक असलेल्या विषयांवर सत्तेतील लोकांनी विरोधकांशी भेटणे काही गैर नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा अनुभव दांडगा आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) त्यांना भेटल्यास त्यात काही वावगे नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

- Advertisement -

हे देखील वाचा : “भुजबळ राजकारणातील फिरता रंगमंच, तर पवारसाहेब…”; संजय राऊतांचा निशाणा

हॉटेल एसएसके येथे त्यांच्या खाजगी भेटीदरम्यान पत्रकारांशी बातचीत करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात राजकीय ध्रुवीकरण होत आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा केल्या जात आहेत. सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने भुजबळ विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणे यात काही गैर नाही. भुजबळ जेष्ठ आहेत ते मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असतील बदलत्या वातावरणात काय भूमिका घ्यायाची हे त्यांचे मत आहे. त्यावर चर्चा, बोलणे योग्य होणार नाही असेही राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेसाठी मुंबईतील ‘या’ २५ जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी

तसेच महसूल कर्मचार्‍यांनी यावेळी विखेंना निवेदन देऊन आपल्या प्रश्नांची जाणीव करून दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महसूल कर्मचार्‍यांच्या संपावर पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे सांगितले. याशिवाय शासन नवनवीन योजना राबवत असताना यंत्रणाशी समन्वय करीत असते. संगणक व्यक्तीकरण संगणकीकरण मोठ्या प्रमाणात झालेला असल्याने कामाचा ताण तितकासा वाढत नाही. मात्र, दाखले देणे, माहिती सांगणे अशा प्रकारच्या कामांचा अतिरिक्त भार पडत असल्याने मनुष्यबळ एकत्रित करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विखेंनी यावेळी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या