Wednesday, September 11, 2024
HomeनाशिकRadhakrishna Vikhe Patil : "जे अनेक वर्ष केंद्रात राहिले त्यांना..."; मंत्री राधाकृष्ण...

Radhakrishna Vikhe Patil : “जे अनेक वर्ष केंद्रात राहिले त्यांना…”; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना टोला

नाशिक | Nashik

जे अनेक वर्ष केंद्रात राहिले त्यांना कांदा प्रश्न सोडवता आला नाही, अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला. तसेच माझ्याकडे खाते नाही त्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाही, असेही ते म्हणाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज नाशिक (Nashik) दौर्‍यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते….

- Advertisement -

Maharashtra Rain Alert : पुढील ७२ तासांत राज्यातील ‘या’ भागांत मुसळधार पाऊस कोसळणार; कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट

यावेळी ते म्हणाले की, मी काल पणनमंत्र्यांशी कांद्याच्या (Onion) प्रश्नावर बोललो. हा विषय काही प्रमाणात केंद्र सरकारशी संबंधित आहे. दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो, यावर मार्ग काढला पाहिजे. उत्तर भारतात आता कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. सरकारही (Government) व्यापा़र्‍यांच्या अडचणी समजून घेत आहे. त्यांना आणखी कुणाला भेटायची गरज नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

Pankaja Munde : ‘भाऊ माझा पाठीराखा’; अडचणीत सापडलेल्या पंकजांना धनंजय मुंडे देणार मदतीचा हात

पुढे धनगर आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवर (Dhangar and Maratha Reservation) बोलतांना ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देणे ही सरकारची भूमिका आहे. आरक्षण मागणे हा अधिकार आहे. न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल न्यायालयात (Court)मान्य झाला आहे. दुर्दैवाने महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आता न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वात समिती तयार केली आहे. धनगर आरक्षणासाठी देखील सरकारने वेळ मागितला आहे. सर्व समाजात आर्थिक दृष्टया मागासलेले लोक आहे. त्या सर्वांच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : नाशकात विजांच्या कडकडाटासह पाऊस; गंगापूर धरणातून ‘इतक्या’ क्युसेसने विसर्ग

- Advertisment -

ताज्या बातम्या