Monday, May 5, 2025
Homeनगरशेवटच्या भागातील शेतकर्‍याला वेठीस धरल्यास सहन करणार नाही

शेवटच्या भागातील शेतकर्‍याला वेठीस धरल्यास सहन करणार नाही

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला इशारा

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

पाणीपुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेल्या जुन्या ब्रिटीशकालीन योजना सक्षम करण्याचे धोरण विभागाने हाती घेतले असून, लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकर्‍याला पाणी मिळाले पाहिजे हिच भूमिका आहे. मात्र ज्यांना जनतेने नाकारले तेच आता स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी पाण्यासाठी राजकारण करून दांडगाई करीत आहेत. मात्र शेवटच्या भागातील शेतकर्‍याला वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

- Advertisement -

भंडारदरा प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रवरा उजव्या आणि डाव्या कालव्यावरील वॉटर कोर्स आणि वितरीकांच्या नूतनीकरणाचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.दाढ बुद्रुक आणि आश्वी खुर्द (ता.संगमनेर) येथे झालेल्या कार्यक्रमास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, अण्णासाहेब भोसले, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांसह सर्व संस्थांचे संचालक आणि लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्यादृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यापूर्वी कालव्याच्या कामांना कधीही निधी मिळाला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने कालव्याचे नूतनीकरण होत असून जुन्या पारंपरिक सिंचन व्यवस्था या माध्यमातून अधिक सक्षम होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी या तालुक्यातील उजव्या कालव्यावर सुमारे 23 हजार हेक्टर क्षेत्र तर डाव्या कालव्यावर 23 हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. कालव्यांच्या जीर्ण आवस्थेमुळे 700 एकर जमीन पाण्यापासून वंचित राहात होती. परंतु आता दोन्ही कालव्यांकरिता सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने व नुतनीकरणामुळे लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकर्‍याला पाणी मिळेल ,असा प्रयत्न विभागाचा असल्याचे नामदार विखे पाटील म्हणाले.

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे. यासाठी पायाभूत सिंचन व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम विभागाने हाती घेतले आहे. भंडारदरा धरणामध्ये अधिकचे पाणी निर्माण करणे आणि पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळविण्यासाठी विभागाने प्रयत्न सुरू केले असल्याचे स्पष्ट करून निळवंडे धरणाचे काम महायुती सरकारने पूर्ण केले. यंदाच्या आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी मिळावे म्हणून चांगले नियोजन विभागाने केले. आणखी एखादे आवर्तन होईल, असा प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, निळवंडेचे आवर्तन चांगल्या पध्दतीने सुरू असताना आता यामध्ये तालुक्यात अडथळे निर्माण करण्याचे काम होत आहे. सर्व तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी देण्याची जबाबदारी ही जलसंपदा विभागाची आहे. परंतु आम्हालाच मिळाले पाहिजे आणि दुसर्‍यांना नको ही भूमिका योग्य नसल्याचे ठणकावून सांगतानाच ज्यांना जनतेने नाकारले ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी दांडगाई करून पाण्यासाठी राजकारण करीत आहेत. परंतु तुम्ही या भानगडीत पडू नका राज्यात महायुतीचे सरकार आहे.पाण्याच्या प्रश्नात आम्हाला राजकारण करायचे शेतकर्‍यांना कोणी वेठीस धरत असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

NEET : नाशिक जिल्ह्यातून ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ परीक्षा

0
नाशिक | प्रतिनिधी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी होणारी नीट परीक्षा रविवारी झाली. दहा हजार 378 पैकी 10120 जणांंनी ही परीक्षा नाशिकमध्ये दिली. मात्र, या परीक्षेच्या वेळेआधी परीक्षा...