Saturday, May 3, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Shirsat : "गरज नसेल तर खाते..."; लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा...

Sanjay Shirsat : “गरज नसेल तर खाते…”; लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने मंत्री शिरसाट संतापले

मुंबई | Mumbai 

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Government) आणण्यात गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सरकारसाठी आता अडचणीची ठरताना पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी लागणारा निधी सामाजिक न्याय विभागाच्या (Social Justice Department) खात्यातून वळवला जात असल्याचे समोर आले आहे. यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला असून, सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर खाते बंद करा, असे म्हणत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

- Advertisement -

मंत्री संजय शिरसाट (Minister Sanjay Shirsat) माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, “लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा सव्वाचारशे कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला असून याची मला काहीच कल्पना नाही. मी वारंवार सांगत आहे की असे करता येणार नाही पण निधी वर्ग केला जात आहे. सामाजिक न्याय खात्याची आवश्यकता नसेल किंवा गरज नसेल तर सरळ हे खातेच बंद करून टाका. हा अन्याय आहे की कट हे मला माहीत नाही. मात्र, या विषयावर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी बोलणार आहे”, असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “सामाजिक न्याय खाते हे दलित वर्गासाठी आहे, पहिलाच निधी अपूर्ण पडत आहे. अर्थ विभागाकडून मनमानी सुरु असून, ते बरोबर नाही. आदिवासी खाते, सामजिक न्याय खाते कशासाठी आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाही का? माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. याबद्दल काही नियम आहेत का नाही?
माझ्या खात्याचे दायित्व जवळपास १५०० कोटी रुपयांचे (Money) आहे. असा निधी गेला तर मग उरलं काय? असं झालं तर विद्यार्थांच्या शिष्यवृ्त्तीला उशीर होईल, जेवणाचे पैसे उशीरा पोहोचतील. अशाने हा विभाग विस्कळीत होईल. मला वाटतं असं होऊ नये यासाठी माझे प्रयत्न असतील”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

लाडकी बहीण योजनेसाठी किती निधी वळवला?

लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) आदिवासी विकास विभागाच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात ३२४० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ३३५.७० कोटी इतका निधी महिला व बाल विकास विभागास वळवण्यात आला आहे. तर सामाजिक न्याय विभागाच्या ३९६० कोटी निधीपैकी ४१०.३० कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आले आहेत.

 

 

 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi News : शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल, मंदिर बॉम्बनं उडवण्याची...

0
शिर्डी । Shirdi पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता वाढलेली असतानाच, आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि श्रद्धेचं केंद्र असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी...