Saturday, May 4, 2024
Homeनगरमंत्री तनपुरे यांनी बोलावली तातडीची बैठक

मंत्री तनपुरे यांनी बोलावली तातडीची बैठक

करंजी (प्रतिनिधी)-

कल्याण- विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव येथील रस्ता रूंदीकरणाबाबत वाद असून याबाबत नागरिकांनी राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना साकडे घालताच त्यांनी यबाबात सेामवारी (दि.6) तातडीची बैठक बोलावली आहे.

- Advertisement -

तिसगावच्या गुरुवार पेठेतील दुकान मिळकती व इतर घर मिळकतीच्या जागा रस्ता रुंदीकरणासाठी संपादित न करण्यासाठी गावच्या व्यापार्‍यांसह काही ग्रामस्थांनी राज्यमंत्री तनपुरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल. निवेदनात म्हटले आहे, महसूल विभागाकडून झालेल्या सर्वेवर आमची हरकत असून संपादित करावयाच्या जागेवर आमची दुकाने आणि मिळकती आहेत. त्यावरच आमचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे. व्यवसायाची जागा या रस्त्यासाठी संपादन झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन कुटुंब रस्त्यावर येईल.

त्यामुळे शासनाला कोणत्याही परिस्थितीत दुकान मिळकती हस्तांतरित करु नयेत, तसेच शासनाचा मोबदला देखील घ्यायचा नाही. आहे तो रस्ता भरपूर मोठा असल्याने तसेच वाहतूक सुरळीत होत असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतुकीला अडचण नाही. त्यामुळे चुकीच्या झालेल्या सव्हेंला विरोध असून आमच्या जागा, जमिनी संपादित करण्यात येऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी गावचे बाबा पुढारी, ग्रामपंचायत सदस्य पापाभाई तांबोळी, आरीफ तांबोळी, अ‍ॅड. अय्याज इनामदार, कदीर पठाण वसिम सय्यद, सिकंदर पठाण, बाळासाहेब हरिभाऊ थोरात, राजीव कटारीया, चंद्रकांत भावसार, फिरोज तांबोळी, समीर पठाण, जावेद सय्यद, बाबा पुढारी, खाजाभाई शेख, नजीर पठाण, दिलावर पठाण, मोईम पठाण आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या