Sunday, September 29, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभेपूर्वी उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; गावितांची पक्षाला सोडचिठ्ठी, 'तुतारी' फुंकणार?

विधानसभेपूर्वी उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; गावितांची पक्षाला सोडचिठ्ठी, ‘तुतारी’ फुंकणार?

मुबंई | Mumbai

लोकसभेत भाजपची (BJP) घसरगुंडी उडाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत.अशातच आता मंत्री विजयकुमार गावित (Minister Vijay Kumar Gavit) यांचे बंधू आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित (Rajendra Kumar Gavit) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. पण पक्षात राहून तिकीट न मिळण्याची जाणीव झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sharad Pawar On Rohit Pawar : “त्याची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची…”; शरद पवारांकडून रोहित पवारांबाबत मोठे संकेत

यावेळी पक्षाचा राजीनामा (Resignation) देताना ते म्हणाले की, आगामी विधानसभेत (Vidhansabha) शहादा-तळोदा मतदारसंघात (Shahada-Taloda Constituency) कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहे, असे राजेंद्रकुमार गावित यांनी म्हटले आहे. त्यामुळे गावित यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकल्याचे स्पष्ट झाले असून ते ‘तुतारी’ हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तळोदा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राजेश पाडवी (Rajesh Padvi) आमदार (MLA) आहेत. त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच गावित यांनी भाजपमधील पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर नंदूरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.

हे देखील वाचा : PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन; विरोधकांवर साधला निशाणा, म्हणाले…

दरम्यान, शहाद्यात राजेंद्रकुमार गावित यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तसेच शैक्षणिक संस्थांचे जाळं पाठिशी असल्याने त्यांच्या नावाला वलय आहे. त्यामुळे गावित अन्य पक्षात गेल्यास किंवा अपक्ष लढल्यास भाजपला फटका बसू शकतो.तसेच धनगर आरक्षणाबद्दल (Dhangar Reservation) महायुतीने (Mahayuti) घेतलेली भूमिकादेखील गावित यांच्यासाठी डोकेदुखी ठरली होती. नंदूरबार आदिवासी जिल्हा असल्याने महायुतीच्या भूमिकेचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

हे देखील वाचा : Political Special : महायुतीकडून जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न

२०१४ मध्ये गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती विधानसभा निवडणूक

राजेंद्रकुमार गावित यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) विधानसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा जवळपास साडे अकरा हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. पण भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. राजेश पाडवींना तिकीट मिळाले. त्यांनी निवडणूक जिंकली. नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक लढवण्यासही ते इच्छुक होते. नंदूरबार लोकसभेसाठी त्यांनी मुलाखतही दिली होती. पण त्यात त्यांना अपयश आले. पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या