Saturday, March 29, 2025
Homeदेश विदेशदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत 40 टक्के घट – आरोग्य मंत्रालय

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत 40 टक्के घट – आरोग्य मंत्रालय

सार्वमत

नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत 40 टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोना रुग्णांची संख्या 1007 ने वाढली आहे आणि 13 हजार 387 झाली आहे. तर 24 तासात 23 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत 40 टक्के घट झाली आहे. आपण कोरोनाशी कसोशीने लढा देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

15 मार्च ते 31 मार्च या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि 1 एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले रुग्ण यांची तुलना केली असता एप्रिल महिन्यात हे प्रमाण कमी झाल्याचं दिसतं आहे. आपण चाचण्यांची संख्या वाढवली आहे तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येतं आहे असंही अग्रवाल यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दै. ‘देशदूत’ आयोजित ‘पंचवटी अनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’ला वाढता प्रतिसाद

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील नागरिकांच्या भेटीचा ओघ हे 'देशदूत पंचवटी अनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो'च्या दुसऱ्या दिवसाचे...