Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहिलेच्या हत्येप्रकरणी अल्पवयीन दिरास अटक

महिलेच्या हत्येप्रकरणी अल्पवयीन दिरास अटक

जायखेडा | वार्ताहर Jaikheda

- Advertisement -

बागलाण तालुक्यातील खामलोण शिवारात झालेल्या परप्रांतीय महिलेच्या हत्त्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. या संदर्भात जायखेडा पोलिसांनी मृत महिलेच्या अल्पवयीन दिराला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामलोण शिवारातील मंगल लक्ष्मीकांत धोंडगे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये नानुबाई सखाराम सस्ते (२०) या परप्रांतीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली होती.

या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीसप्रमुख बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीरसिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट देवून या गुन्ह्याच्या तपासाचे निर्देश दिले होते. पोलिसांनी प्रथम या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेतली होती.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत व शवविच्छेदनात मयत महिलेच्या डोक्यावर हत्त्याराने मारल्याच्या खुना आढळून आल्या होत्या. पोलिसांनी या संदर्भात प्रारंभी अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या महिलेचा १५ वर्षीय दीर याने तिला मारहाण करीत हत्त्या केल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. सदरचा खून त्याने कां केला याबाबत सविस्तर तपास सुरू आहे.

जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, उपनिरीक्षक संदीप चेडे, नानासाहेब पाटील, हवालदार देविदास गोविंद, विनोद मोरे, योगेश क्षीरसागर, दिनेश जाधव, सागर शेवाळे, अरूण वनसे, अक्षय पाटील यांनी या प्रकरणात कसून व तातडीने तपासचक्रे फिरविल्याने हा गुन्हा उघडकीस आला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...