Friday, April 25, 2025
Homeक्राईमअल्पवयीन मुलावर धारदार वस्तूने हल्ला

अल्पवयीन मुलावर धारदार वस्तूने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तिघांनी अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार वस्तूने वार करून त्याला जखमी केले. जखमी मुलावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख आसद अख्तर, शेख उनेस आबीद व शेख अख्तर महेबूब (सर्व रा. खाटीक गल्ली, जुना मंगळवार बाजार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

सदरची घटना शुक्रवारी (18 ऑक्टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास ब्राम्हणगल्ली, बारातोंटी कारंजा जवळ घडली. फिर्यादी हा त्याच्या आजोबाच्या गोळ्या आणण्यासाठी मेडिकलमध्ये पायी जात असताना तिघांनी त्याला दुचाकी आडवी लावली. शिवीगाळ केली असता त्याने शिव्या का देता, मला का अडवले अशी विचारणा केली असता त्याचा त्यांना राग आला. रागातून आसद याने धारदार वस्तूने फिर्यादीवर चार ठिकाणी वार करून जखमी केले.

जखमी फिर्यादी खाली कोसळताच ते तिघे घटनास्थळावरून पसार झाले. फिर्यादीला त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने रूग्णालयात नेले. त्याने उपचारादरम्यान पोलिसांना जबाब दिला आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर शेख अख्तर महेबूब हा फिर्यादीच्या घरी गेला व आमच्यावरती कंम्प्लेट करू नका असे म्हणून महिलांना शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...