Thursday, May 8, 2025
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला तीन वर्षे सक्तमजुरी

Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला तीन वर्षे सक्तमजुरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस दोषी धरून 3 वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. लखन सुदाम सौदागर (वय 25 रा. सावेडी, अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती वैशाली राहुल राऊत यांनी काम पाहिले.

- Advertisement -

21 फेब्रुवारी 2020 रोजी पाच वाजेच्या दरम्यान फिर्यादी, त्यांची पत्नी बाहेर गेले असताना पीडिता (वय 12) ही घरी एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश करून पीडितेसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी हे याबाबत आरोपीस विचारणा करण्यासाठी गेला असता दोघा आरोपींनी फिर्यादी, फिर्यादीचा मुलगा व पिडीता यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेचा संपूर्ण तपास तात्कालीन सहा. पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी केला व न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकुण सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पीडित मुलगी तसेच पीडित मुलीचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकार यांची साक्ष महत्वाची ठरली. सदर खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार आर. डी. आडसुळ, नितीन गायकवाड यांनी सहकार्य केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

भारतीय सैन्यदलाची कामगिरी अभिमानास्पद- माजी मंत्री थोरात

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner आतंकवाद हा मानवता धर्मासाठी सर्वात मोठा धोका असून संपूर्ण जगातील आतंकवाद हा संपलाच पाहिजे. पहेलगाम मध्ये निरापराध भारतीयांवर आतंकवाद्यांनी केलेला हल्ला हा...