Friday, July 24, 2026
Homeनगरलग्नासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला विवस्त्र केले

लग्नासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला विवस्त्र केले

पीडितेच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्न करण्यासाठी घरात घुसून अल्पवयीन मुलीला (वय 16) विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी (1 सप्टेंबर) दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास नगर शहरातील एका उपनगरात घडली. याप्रकरणी पीडिताने रात्री दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द विनयभंग, पोक्सो, मारहाण आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

रेहान दिलावर शेख, फरहान असिफ शेख (दोघे रा. पिंजार गल्ली, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, भिंगार कॅम्पचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. रविवारी दुपारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी तिच्या घरी असताना रेहान शेख व फरहान शेख यांनी तिच्या घरात अनधिकाराने प्रवेश केला. ‘तु तुझ्या आई- वडिलांना माझ्या बरोबर लग्न लावून देण्यास सांग’ असे म्हणून तिला विवस्त्र केले.

लैंगिक छळवणूक करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. विनयभंग करून तिचा यापूर्वी देखील वेळोवेळी लैंगिक हेतूने चोरून पाठलाग करून विनयभंग केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक के. एस. साळुंखे करत आहेत.

ताज्या बातम्या

पंचवटी

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने...

0
नाशिक | प्रतिनिधीजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर...