Thursday, September 24, 2026
HomeनगरSangamner : अ‍ॅसिड हल्ल्यातील संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

Sangamner : अ‍ॅसिड हल्ल्यातील संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

पोलिसांकडून माहिती देण्याबाबत आवाहन तर पथकेही घेतायेत शोध

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, शहर व तालुका पोलीस यांची वेगवेगळी पथके करत आहे. त्यानुसारच प्रत्यक्षदर्शींकडे तपास करुन त्यांनी वर्तवलेल्या हकीगतीप्रमाणे संशयित आरोपीचे रेखाचित्र पोलिसांनी जारी करत माहिती देण्याबाबत आवाहन केले आहे.

- Advertisement -

सदर घटनेच्या दिवशी कच्च्या रस्त्यावर अंदाजे व 32 ते 35 वयाच्या अज्ञात इसमाने विद्यार्थिनी शाळेतून सायकलवरुन घरी जात असताना तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून अ‍ॅसिडसदृश्य द्रव पदार्थ तिच्या चेहर्‍यावरील उजव्या बाजूस फेकून गंभीर जखमी केले आहे. त्यावरुन संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा, संगमनेर शहर पोलीस व तालुका पोलीस ठाणे यांचे वेगवगळे पथके शोध घेत आहे. तसेच न्यायवैद्यक पथकानेही (फॉरेन्सिक टिम) पाहणी केली आहे. सध्या जखमी मुलीवर लोणीतील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार सुरु आहेत.

दरम्यान, सदर गुन्ह्याच्या तपासात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करुन त्यांनी वर्तवलेल्या हकीगतीप्रमाणे संशयित आरोपीचे रेखाचित्र रेखाटण्यात आलेले आहे. त्यानुसार रेखाचित्रातील अज्ञात आरोपीबाबत काही माहिती मिळाल्यास अथवा ओळखल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकार बँकेच्या निवडणुकीसाठी येत्या 2 नाव्हेेंबरला मतदान प्रक्रिया पार पडून 3 नाव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत प्रारूप निवडणूक...