Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; संशयित आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; संशयित आरोपीस अटक

घोटी । वार्ताहर Ghoti

- Advertisement -

अल्पवयीन मुलीला फुस लाऊन पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी घोटी पोलीसांनी संशयिताला अटक करून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की १३ जुलै रोजी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार संबधित मुलीच्या पालकांनी दिली होती. याची गंभीर दखल घेऊन घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अज्ञात आरोपीच्या शोधण्यासाठी पोलीस पथके तयार केली होती.

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला घेवुन संशयित हा तळ्याची वाडी,( खोडाळा, ता. मोखाडा, जि पालघर )येथे असल्याची गुप्त माहिती पोलिस पथकाला सुत्रांकडून माहीती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे व पो.हवा. संतोष नागरे, पो.हवा. श्रीकांत खैरे यांनी पालघर जिल्ह्यात जाऊन आरोपी व अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घोटी पोलीस ठाण्यात हजर केले.

यावेळी अल्पवयीन मुलीस पोलीसांनी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बळजबरी अत्याचार केला असल्याचे सांगितल्याने यातील आरोपी दिलीप मोहन वाघ, वय १९ वर्ष, रा. तळ्याची वाडी, खोडाळा, ता. मोखाडा, जि. पालघर यास अटक करण्यात आली.

सदर गुन्ह्यात दिलीप वाघ या संशयित आरोपीवर भान्यासं कलम ६४(२) सह पोस्को कायदा कलम ४,६,८,१२ हे वाढीव कलम लावले असुन सदर गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सुरेखा देवरे पोहवा संतोष नागरे, पो.हवा. श्रीकांत खैरे हे करीत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...