Tuesday, April 29, 2025
Homeनगरउसाच्या शेतात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

उसाच्या शेतात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील एका कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मंगळवारी (दि. 31) तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अशोक (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) नावाच्या युवकाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून व जुलै महिन्यात घडली आहे.

- Advertisement -

नगर शहरात आई-वडिल व भावासह राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिचे शैक्षणिक वर्ष जून महिन्यात चालू झाल्याने ती एक दिवस कॉलेजला आली असता तिला एक 22 ते 23 वर्षाचा युवकाने गेटवरच आवाज दिला. माझा मोबाईल नंबर घे, असे म्हणाला असता फिर्यादी मुलीने नकार दिला. दरम्यान, फिर्यादी मुलगी त्यानंतर एक दिवस कॉलेजला आली असता त्या मुलाने तिला त्याच्या दुचाकीवर बसवून वारूळाचा मारूती, दातरंगे मळा परिसरातील उसाच्या शेतात नेले व तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

तुझ्या आई-वडिलांना सांगेल, अशी धमकी देऊन कॉलेज मध्ये आणून सोडले. फिर्यादीने सदरचा प्रकार कोणालाही सांगितला नाही. जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात तो मुलगा फिर्यादीला भेटला असता तिने त्याचे आधारकार्ड मागितले. त्यावर अशोक नावाचा उल्लेख होता. त्या मुलाने पुन्हा फिर्यादी मुलीला वारूळाचा मारूती, दातरंगे मळा परिसरातील उसाच्या शेतात नेले व पुन्हा बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर तो मुलगा कॉलेज परिसरात पुन्हा दिसून आला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : एमआयडीसीतील कंपनीतून सव्वा दोन लाखांच्या स्क्रॅपची चोरी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar एमआयडीसीतील मिस्त्री ऑटो इंजिनिअर प्रा. लि. कंपनीतून तब्बल दोन लाख 20 हजार रुपये किमतीचे 2.5 टन वजनाचे लोखंडी शीट व स्क्रॅपचे तुकडे...