Monday, June 17, 2024
Homeक्राईमलॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अत्याचार करणारा तरुण पसार || पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

लॉजवर घेऊन जात अल्पवयीन मुलीवर (वय 15) अत्याचार केल्याची घटना नगर तालुक्यातील इमामपूर शिवारात घडली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तरुणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिनाथ लोंढे (हल्ली रा. भराट गल्ली, भैरवनाथ मंदिराशेजारी, खासगी होस्टेलमध्ये, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगरमध्ये राहते व अकरावीमध्ये शिक्षण घेते. तिची आदिनाथ सोबत ओळख होती.

आदिनाथने ओळखीचा फायदा घेत तिला दुचाकीवरून बुधवारी (दि. 29) दुपारी साडेबाराच्या सुमारास इमामपूर (ता. नगर) शिवारातील एका लॉजवर नेले. लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरीने अत्याचार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान सदरचा प्रकार फिर्यादी अल्पवयीन मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी रात्री एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आदिनाथ लोंढे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोंढे अधिक तपास करत आहेत.

अल्पवयीन असूनही लॉजमध्ये प्रवेश
आदिनाथ व पीडितेची ओळख असल्याचे पोलिसांकडून समजले. याच ओळखीतून त्याने तिला त्याच्या दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील इमामपूर शिवारातील लॉजवर नेले. लॉजच्या मालकाने मुलगी अल्पवयीन असून देखील तिला लॉजमध्ये प्रवेश दिला. त्या लॉज मालकावर पोलीस कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान मुलीला लॉजचे नाव माहिती नसल्याने फिर्यादीत लॉजच्या नावाचा उल्लेख नाही. तपासातून लॉजचे नाव समोर येईल असे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोंढे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या