श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपुरात डार्लिंग म्हणत विद्यार्थिनीचे कपडे फाडून विनयभंग करण्याची घटना शहरातील वॉर्ड नं. 2 परिसरात घडली आहे. शहरात वॉर्ड नं. 2 मधील उर्दू शाळेजवळ बिफ मार्केट परिसरात एक अल्पवयीन विद्यार्थिनी कचरा टाकण्यासाठी जात असताना रेहान शेख, आयान शेख तिला हे माय डार्लिंग, माय डार्लीग म्हणाले. तेव्हा विद्यार्थीनीने या बद्दल जाब विचारला असता आरोपी शब्बीर शेख म्हणाला हिचे कपडे फाडा. तेव्हा रेहानने धक्का देवून विनयभंग केला व रेहान व आयान यांनी विद्यार्थीनीचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला. तसेच चापटीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रेहान शेख, आयान शेख, शब्बीर शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74, 76, 115 (2), 352, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई श्री.देवरे करत आहेत.