Saturday, September 14, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या दोघांवर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या दोघांवर गुन्हा

लोणी |वार्ताहर| Loni

- Advertisement -

मला तू खूप आवडते, आपण लग्न करू असे म्हणून अल्पवयीन मुलीला (Minor Girl) बळजबरी करणार्‍या प्रवरानगरच्या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल (Filed a Case) केला.

पानमसाला, सुगंधी तंबाखुसह 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

दहावीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी (Minor Girl) शाळेत ये-जा करीत असताना तिचा पाठलाग करून अनेक दिवस त्रास देणार्‍या राहाता (Rahata) तालुक्यातील प्रवरानगर (Pravaranagar) येथील हुजेब शकील शेख व त्याला मदत करणारा साहिल सलीम शेख यांच्या विरुद्ध मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल (Filed a Case) केला. अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत असून तिचे वडील हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करतात. हुजेब हा अनेक दिवसांपासून मुलीला त्रास देत असल्याने त्याने दुसर्‍या गावात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.

शिर्डी लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच

मात्र आरोपीने त्रास देणे थांबवले नाही. हुजेब याने मित्र साहिल याच्या मदतीने मुलीला बळजबरी करून स्कुटीवर बसवून लोणीच्या लोणटेक मंदिर परिसरात नेऊन तिच्या अंगाला झटून तिचा विनयभंग केला. मुलीने घाबरून घरी ही घटना सांगितल्यावर तिच्या वडिलांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या मदतीने लोणी पोलिसात (Loni Police) धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गु.र.नं. 494/23 भादंवि कलम 354, 354 (ड), लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करून दोन्ही आरोपींना अटक (Accused Arrested) केली. गेल्या काही दिवसात अशा प्रकारच्या गुन्ह्यात नगर जिल्ह्यात वाढ झाली असून तीव्र आंदोलने होऊनही घटना कमी होताना दिसत नाहीत.

जम्मूतील युवकावर महिला पोलिसाने केले अंत्यसंस्कार

- Advertisment -

ताज्या बातम्या