Thursday, April 9, 2026
Homeक्राईमCrime News : शाळेत जाताना अल्पवयीन विद्यार्थिनीला छेडले

Crime News : शाळेत जाताना अल्पवयीन विद्यार्थिनीला छेडले

पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील एका उपनगर भागात राहणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीला (वय 14) शाळेत जात असताना एका तरूणाने अडवून छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. साहिल अनिस शेख (रा. मोरया पार्क, बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पीडितेने बुधवारी (18 मार्च) दुपारी फिर्याद दिली आहे. पीडित विद्यार्थिनी ही शिक्षण घेत असून ती दररोज सकाळी शाळेत जात असते. तिच्या जबाबानुसार, साहिल शेख हा मागील काही काळापासून तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. याबाबत विद्यार्थिनीने यापूर्वी आपल्या पालकांना माहिती दिली होती, त्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती.

तथापि, 9 मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास, विद्यार्थिनी शाळेकडे जात असताना संशयित दुचाकीवरून तिच्या मागून आला. त्याने तिला थांबण्यास सांगितले. विद्यार्थिनीने दुर्लक्ष करून पुढे जाताच संशयिताने तिच्या समोर दुचाकी आडवी लावून तिला अडवले. त्यानंतर खाली उतरून तिच्याजवळ येत तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत तिचा हात पकडून जबरदस्ती केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने संशयिताला ढकलून तेथून पळ काढला आणि घरी परतली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

पीडिता मानसिकदृष्ट्या अस्वस्थ
घटनेनंतर ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्याने काही दिवस तिने हा प्रकार पालकांना सांगितला नव्हता. मात्र तिच्या वर्तनातील बदल लक्षात आल्याने पालकांनी चौकशी केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली. यानंतर विद्यार्थिनीने आपल्या आई-वडिलांसह तोफखाना पोलीस ठाण्यात जाऊन संशयित आरोपी साहिल शेख याच्याविरूध्द फिर्याद दिली.

ताज्या बातम्या

Shirdi : भोंदू खरातच्या ताब्यासाठी शिर्डी पोलिसांची न्यायालयात धाव

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि सिन्नर येथील पतसंस्थांमध्ये शेकडो बोगस खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करणार्‍या भोंदूबाबा अशोक खरात च्या मुसक्या आवळण्यासाठी शिर्डी...