Tuesday, December 10, 2024
Homeनगरएमआयडीसी हद्दीत अल्पवयीन मुलीची छेड काढणारा जेरबंद

एमआयडीसी हद्दीत अल्पवयीन मुलीची छेड काढणारा जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍याला वडगाव गुप्ता परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. उमेश उत्तम तुपे (वय 20 रा. वडगाव गुप्ता) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

सोमवारी (दि. 7) सकाळी सव्वा आठ वाजता अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला शाळेत सोडून घराकडे परत येत असताना शेर नदीच्या पुलाजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या उमेश तुपे याने अल्पवयीन मुलीच्या दुचाकीला त्याची दुचाकी आडवी लावली. हात धरून तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने काल (मंगळवारी) एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच सहा. निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पाठक, अंमलदार गणेश नवले, संदीप चव्हाण, किशोर जाधव, सुरज देशमुख, शेरकर, सचिन हरदास यांच्या पथकाने तुपे याला ताब्यात घेत अटक केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या