Friday, May 15, 2026
Homeक्राईमअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीस अटक

नेवासा |प्रतिनिधी|Newasa

अल्पवयीन मुलीस (Minor Girl) लग्नाचे आमीष (Marriage Lure) दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले तसेच तीचा गर्भपात केल्याच्या गुन्ह्यातील घोडेगाव (Ghodegav) येथील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर (LCB Ahmednagar) येथून जेरबंद केले. याबाबत माहिती अशी की, सुनिल अंबादास तांबे (रा. घोडेगांव ता. नेवासा) याने नेवासा (Newasa) येथील अल्पवयीन मुलीस फुस लावुन, लग्नाचे आमिष दाखवून ती अल्पवयीन असताना तिचे सोबत शरीरसंबंध ठेवून अत्याचार केला तसेच गर्भपाताच्या गोळ्या देवुन तीचा गर्भपात केला.

- Advertisement -

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात मागील वर्षी (2023) अत्याचार, फसवणूक, गर्भपात, मारहाण तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी सुनिल तांबे रा. घोडेगांव, हा आगरकरमळा, रेल्वे स्टेशन अहमदनगर परिसरात राहतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने आगरकरमळा परिसरात फिरुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. पुढील तपास नेवासा पोलीस (Newasa Police) करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पालकमंत्र्यांच्या ताफ्यात आता केवळ दोनच वाहनांचा वापर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि अनावश्यक शासकीय खर्च कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाची व्यापक चर्चा सुरू असतानाच अहिल्यानगरचे...