Friday, February 6, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले

Crime News : अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात पकडून विनयभंग केला. तसेच मुलीचे फोटो असलेले व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकले. अविनाश गोरख ठोकळ (रा. उल्हासनगर, ता. कल्याण, जि.ठाणे) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 15 जून 2023 ते जानेवारी 2025 व फेब्रुवारी 2025 दरम्यान केडगाव येथे घडली. याप्रकरणी 14 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अल्पवयीन मुलीच्या आईने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी ही शाळेत जात असताना आरोपी ठोकळ याने तिचा पाठलाग केला, तसेच विनयभंग करत इंस्टाग्रामवर मुलीचे फोटो असलेले व्हिडिओ टाकले. उपाधीक्षक अमोल भारती, निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे हे करीत आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

AMC : दुसर्‍या दिवशीही अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मध्य शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अहिल्यानगर महापालिकेने सलग दुसर्‍या दिवशीही जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. बुधवारी (4 फेब्रुवारी)...