Saturday, July 27, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलींना पळवुन नेणार्‍या आरोपींना 24 तासात अटक

अल्पवयीन मुलींना पळवुन नेणार्‍या आरोपींना 24 तासात अटक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राहुरी (Rahuri) येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Minor Girl Molested) करुन जातीवाचक शिवीगाळ केले बाबत तसेच कोपरगांव (Kopargav) येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले बाबत राहुरी (Rahuri) व कोपरगाव पोलिस ठाण्यात (Kopargav Police Stataion) गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास करून अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तपासाची चक्रे फिरवत दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना 24 तासात अटक (Arrested) केली आहे.

- Advertisement -

धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य

सदर दोन्ही घटना अत्यंत संवेदनशिल असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी पोनि दिनेश आहेर (PI Dinesh Aher) यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पिडीत अल्पवयीन मुलीचा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

या आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ बबन मखरे, शरद बुधवंत, पोना रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संदीप दरदंले, सचिन आडबल, फुरकान शेख, पोकॉ बाळू खेडकर, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोना भाग्यश्री भिटे, मपोकॉ ज्योती शिंदे, चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर व चापोकॉ अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके नेमुण पिडीत अल्पवयीन मुलगी व दोन्ही आरोपींचा (Accused) शोध घेणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.

पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या

पथक प्रथम राहुरी (Rahuri) येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी शाहनवाज शेख याचा शोध घेत असताना तो बीड येथे असले बाबत माहिती मिळाल्याने पथकाने बीड (Beed) येथे नेमणुकीस असलेले पोना मनोज वाघ यांना मदतीस घेवुन आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त करुन आरोपी शाहनवाज असिफ शेख रा. वांबोरी, ता. राहुरी हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपास कामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले. दुसरे पथक कोपरगांव शहर येथे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी यांचा प्रथम पुणे (Pune), लोणावळा (Lonawala) येथे शोध घेतला.

परंतु ते नवी मुंबई (Mumbai) येथील वाशी (Washi) या ठिकाणी असले बाबत माहिती प्राप्त होताच पथकाने वाशी पोलीस स्टेशनचे पोसई निलेश बारसे यांना मदतीस घेवुन पिडीत व आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती प्राप्त करुन पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी तौफिक मिटु पठाण, रा. बोधेगांव, ता. शेवगांव हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

जिल्ह्यासाठी आणखी आठ फिरते पशूचिकित्सालय

- Advertisment -

ताज्या बातम्या