Monday, July 27, 2026
HomeनगरBribery News : मिरजगावमध्ये पोलीस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात

Bribery News : मिरजगावमध्ये पोलीस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 23 एप्रिल) उघडकीस आली. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दीपक पवार यांनी मिरजगाव परिसरातील क्रांती चौकात चालणार्‍या जुगार क्लबच्या चालकाकडे क्लब सुरळीत चालू ठेवण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. संबंधित व्यक्तीने याबाबत अहिल्यानगर येथील एसीबीकडे पूर्वीच लेखी तक्रार दिली होती.

- Advertisement -

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी सुमारे 3 वाजता मिरजगाव येथील क्रांती चौक परिसरात आरोपी पवार यांना बोलावण्यात आले. तक्रारदाराने त्यांना ठरलेली 5 हजार रुपयांची रक्कम दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ कारवाई करत पवार यांना रंगेहात पकडले.या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, बाबासाहेब कर्‍हाड, रवी निमसे व चालक हरून शेख यांनी सहभाग घेतला. सापळा यशस्वी झाल्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २७ जुलै २०२६ – यश शिरावर घेताना,विवेक पायाशी हवा

0
जंतरमंतरच्या ऐतिहासिक मैदानावर नुकताच घडलेला घटनाक्रम भारताच्या तरुणाईच्या अफाट ताकदीची आणि संघटित ऊर्जेची साक्ष देणारा ठरला. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या ‘जेन झी’ पिढीचे प्रतिनिधित्व...