Friday, May 31, 2024
Homeनगरमिरजगावचे सरपंच पती पोलिसांना सापडेनात

मिरजगावचे सरपंच पती पोलिसांना सापडेनात

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांचे पती नितीन ज्ञानोबा खेतमाळस यांनी पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज भरले नाही व दिलेला धनादेश वटला नाही, म्हणून त्यांच्यावर फौजदारी कायद्यान्वये न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. मात्र ते शहरातून राजरोस फिरत असताना देखील पोलिसांना सापडत नाहीत, यामुळे अखेर न्यायाधीशांनी याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच यांचे पती नितीन ज्ञानोबा खेतमाळस यांनी मराठा नागरी सहकारी पतसंस्थेकडून दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जामधील दोन लाख 62 हजार 994 रुपयांचा धनादेश थकबाकी पोटी यांनी पतसंस्थेला दिला होता. मात्र तो धनादेश वटला नाही. यामुळे पतसंस्थेने त्यांच्या विरोधात नगर येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मराठा पतसंस्थेने नितीन खेतमाळस यांना वारंवार वॉरंट काढूनही त्यांना पोलीस याची बजावणी करत नाहीत.

यामुळे न्यायालयाने नितीन खेतमाळीस यांना पकडण्याचे वॉरंट काढले असून, याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना थेट कारणे दाखवा नोटीस दिली आहे. यात आपण वॉरंट बजावणी का करत नाहीत, अशी विचारना न्यायालयाने केली आहे. यामुळे मिरजगाव पोलिसांची पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मानहानी झाली आहे. दुसरीकडे मिरजगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच पती ज्ञानोबा खेतमाळीस याच्या अती हस्तक्षेप व कामांमधील ढवळाढवळीने दहा सदस्यांनी नुकतेच ग्रामपंचायतीला टाळे ठोकले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या