Sunday, May 26, 2024
HomeनाशिकNashik Crime News : कंपनीच्या साहित्याची परस्पर विक्री करुन साडेतीन कोटींचा अपहार

Nashik Crime News : कंपनीच्या साहित्याची परस्पर विक्री करुन साडेतीन कोटींचा अपहार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील अंबड पोलीस ठाणे (Ambad Police Station) हद्दीतील एका कंपनीचा ताबा घेऊन कंपनी मालकाचे (Company Owner) कंपनीतील इलेक्ट्रॉनिक्स पार्टसह मशिनरी व इतर साहित्य असा एकूण ३.५ कोटी रुपयांचा मुद्देमालाची परस्पर विक्री करून अपहार (Embezzlement) केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

Nashik Crime News : ५० कोटींची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून तरुणाला सात लाखांना गंडा

याबाबत अधिक माहिती अशी, सदर घटना १० जानेवारी २०२३ ते १० ऑक्टोबर २०२३ दरम्यान प्लॉट क्रमांक १४ दातीर मळा अंबड एमआयडीसी नाशिक या ठिकाणी घडली. याप्रकरणी वीरेंद्र नथू झोपे (वय ५४, रा. दाते नगर, अथर्व मंगल कार्यालयाच्या मागे गंगापूर रोड नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Nashik Crime News : दरोडा व शस्त्रविरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी; बेकायदेशीररित्या कोयता व चाकू बाळगणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या

त्यानुसार पोलिसांनी (Police) धर्मेंद्र मौर्य (राहणार माहिती नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. धर्मेंद्र याने त्याच्या कंपनीच्या मार्फत झोपे यांच्या कंपनीचा ताबा घेऊन झोपे यांच्या कंपनीचे रोबोटिक्स व ऑटोमॅटिक मशिनरीसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट व मशीनरी, ऑफिससाठी ठेवलेले फर्निचर व इतर साहित्य असा साडेतीन कोटी रुपयांचा माल परत न करता परस्पर विक्री करून अपहार केला म्हणून गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : सुषमा अंधारेंच्या प्रतिमेला शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’; दिला ‘हा’ इशारा, पाहा Video

- Advertisment -

ताज्या बातम्या