Tuesday, March 25, 2025
Homeक्राईममुंढेकर वाडीतील हरवलेल्या महिलेचा खून

मुंढेकर वाडीतील हरवलेल्या महिलेचा खून

दोघांनी सातारा परिसरात नेवून काढला काटा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये मुंढेकर वाडी. ता.श्रीगोंदा येथील पंधरा दिवसापासून मीसिंग दाखल असलेली माहिला सुभद्रा राजेंद्र मुंढेकर (40) यांचा खून सातार्‍याजवळ करण्यात आला असल्याचे उघड झाले आहे. याबाबत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. नाजूक कारणातुन हा खून झाल्याची चर्चा असून दोन जण संशयित ताब्यात घेऊन कोरेगाव जिल्हा सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

- Advertisement -

तपासानंतरच अधिक विषय समोर येणार आहे. मुंढेकरवाडी येथील महिला सुभद्रा राजेंद्र मुंढेकर या हरवल्या असल्याची ताक्रार श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती. याबाबत श्रीगोंदा पोलीस शोध घेत असताना महिलेच्या नातेवाईकांनी सदर महिला ही राजेंद्र देशमुख याचसोबत गेली असावी असा संशय व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने तपास चालू असताना तांत्रिक तपासाच्या आधारे श्रीगोंदा पोलीसानी संशयित इसम राजेंद्र जगनाथ देशमुख (रा मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा) व त्याचा साथीदार बिभीषण सुरेश चव्हाण (रा. बाभळगाव, ता. इंदापूर) यांना ताब्यात घेतले.

त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी सातारा जवळ मिसिंग महिलेचा खून करून तीचा मृतदेह कॅनॉलच्या पाण्यात टाकून दिला अल्याची कबुली दिली. याबाबत यापूर्वी सदर मयत महिलेबाबत कोरेगाव पोलीस स्टेशन गुन्हा दाखल आहे. श्रीगोंदा पोलीसांनी कोरेगाव पोलीस स्टेशनला माहिती देऊन नमूद दोन्ही संशयीतांना कोरेगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जयभवानी रोड, लोणकर मळा, नाशिकरोड येथे मध्यरात्री १ वाजता बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले व त्याआधी २० मार्च रोजी...