Tuesday, July 28, 2026
HomeनगरRahata : बेपत्ता असलेल्या तरुणाचा खाणीत आढळला मृतदेह

Rahata : बेपत्ता असलेल्या तरुणाचा खाणीत आढळला मृतदेह

एकरुखे |वार्ताहर| Ekrukhe

राहाता (Rahata) तालुक्यातील सावळीविहीर येथील एका दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह (Youth Deadbody) आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह रांजणगाव खुर्द येथील सिद्धार्थ राजेंद्र गाढवे (वय 26) या तरुणाचा असल्याची ओळख पटली असून त्याच्या अंगातील जॅकेट आणि सँडलवरून नातेवाईकांनी त्याला ओळखले आहे. घरातील कर्ता मुलगा गेल्याने रांजणगाव (Ranjangaon) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

सिद्धार्थ गाढवे हा व्यवसायाने वेल्डर होता. 4 फेब्रुवारी रोजी तो कामानिमित्त घराबाहेर पडला होता. कामाच्या स्वरूपामुळे तो अनेकदा बाहेर राहत असल्याने सुरुवातीला कुटुंबीयांना काही वाटले नाही. मात्र अनेक दिवस उलटूनही तो घरी परतला नाही आणि त्याचा फोनही लागेनासा झाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. 15 फेब्रुवारी रोजी सावळीविहीर येथील खाणीत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना दिसला. शिर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. मृतदेह (DeadBody) पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

परंतु तपासादरम्यान पोलिसांनी मृतदेहाच्या अंगावरील जॅकेट आणि जवळच असलेले सँडल बाजूला काढून ठेवले होते. ही माहिती मिळताच सिद्धार्थच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलीस स्टेशन (Shirdi Police Station) गाठले. तेथील कपडे आणि सँडल पाहताच तो सिद्धार्थच असल्याचे स्पष्ट झाले आणि कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. सिद्धार्थ हा तरुण वयाचा आणि कष्टाळू मुलगा होता. कुटुंबाची सर्व जबाबदारी तो पेलत होता. त्याच्या निधनाने गाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा घातपात आहे की अपघात, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : जायकवाडीचा साठा 58.52 टक्क्यांवर

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरूपाचे आगमन होत आहे. धरणातील विसर्ग नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने घटविण्यात आले आहेत. गोदावरीत काल सायंकाळी...