Monday, October 14, 2024
Homeनगरनगरहून बेपत्ता झालेल्या राहुरीतील तरूणाचा मृतदेह आढळला

नगरहून बेपत्ता झालेल्या राहुरीतील तरूणाचा मृतदेह आढळला

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) येथील महेंद्र उर्फ स्वप्निल सुधीर वैद्य (वय 29) या तरुणाचा मृतदेह (Youth Dead Body) ब्राह्मणी जवळील चेडगाव (Chedgav) येथील ओढ्यात शनिवारी सकाळी आढळून आल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी, शहरातील तनपुरे खळवाडी येथील राहणारे सुधीर वैद्य यांचा मुलगा महेंद्र हा नगर एमआयडीसीमध्ये (Nagar MIDC) नोकरीला होता. त्याचे कुटुंबीय राहुरीत राहत होते. महेंद्र हा नगरला खोली भाड्याने घेऊन राहत होता. 2 मे रोजी सायंकाळी कामावरून सुट्टी झाल्यानंतर तो खोलीवर होता. रात्री मेसवर जेवण करण्यासाठी जात असल्याचे सांगून तो गायब झाला.

- Advertisement -

त्या रात्री आई-वडिलांनी त्याच्या मोबाईलवर अनेक फोन केले. मात्र त्याचा फोन लागला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी महेंद्र जेथे राहत होता. तेथे जाऊन पाहिले असता महेंद्रचा मोबाईल व मोटारसायकल तेथेच होती. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी व भावांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली परंतू तो कुठेच सापडत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात (Police Station) शुक्रवार 3 मे रोजी मिसींग दाखल केली.

शनिवारी पहाटेच्या वेळी राहुरी तालुक्यातील चेडगावच्या ओढ्यात त्याचा मृतदेह दूध घालण्यासाठी जाणार्‍या शेतकर्‍यांना आढळून आला. ओळख पटल्यानंतर तो मृतदेह राहुरी नगरपालिकेत कर्मचारी असलेले सुधीर वैद्य यांचा मुलगा महेंद्र असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाची वांबोरी येथील रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. महेंद्रवर राहुरी (Rahuri) येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. महेंद्र उर्फ स्वप्निल वैद्य हा तरूण शांत व मनमिळावू स्वभावचा होता. त्याचे कुणाशीही वैर नव्हते. त्याचा अशा प्रकारे मृत्यू (Death) झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान कामावरून सुट्टी झाल्यानंतर तो गायब झाल्यानंतर नेमका कोठे गेला होता? दोन दिवस तो कोठे राहिला? अशा अनेक प्रश्नांची उकल होत नसल्याने अनेक तर्कविर्तक काढले जात आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात राहुरी पोलिसात (Rahuri Police) गु.र.न. 79/2024 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.स्व. महेंद्र वैद्यच्या पश्चासत आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या