Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशMK Stalin: तामिळनाडूत मुख्यमंत्री एम के स्टॅलिनचा मोठा निर्णय ; बजेटमधून 'रुपयाचे'...

MK Stalin: तामिळनाडूत मुख्यमंत्री एम के स्टॅलिनचा मोठा निर्णय ; बजेटमधून ‘रुपयाचे’ चिन्हच हटविले

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रावरुन वाद सुरू असताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तमिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या बजेटवरील रुपयाचे ₹ हे चिन्ह हटवून त्या ठिकाणी तामिळ भाषेतील ரூ हे चिन्ह ठेवण्याचा निर्णय स्टॅलिन सरकारने घेतला आहे.

१४ मार्च रोजी राज्य विधानसभेत सादर होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पाचा टीझर एमके स्टॅलिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “समाजातील सर्व घटकांच्या लाभाकरिता तमिळनाडूचा व्यापक विकास करण्यासाठी…”.या टिझरमध्ये सुरूवातीला रुपयाचे बदलेले चिन्ह पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

आपल्या देशात हिंदी भाषेतील रुपयाचे ₹ हे चिन्ह प्रतीक मानले जाते. त्यालाच आता तामिळनाडू सरकारने तामिळ भाषेतील ரூ हे चिन्ह पर्याय म्हणून निवडले आहे. असा निर्णय घेणारे तामिळनाडू हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून तामिळनाडूवर हिंदी भाषेची जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केला आहे.

नेमका वाद काय आहे?
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण ( (एनईपी) मधील प्रस्‍ताविक त्रिभाषिक सूत्रावरुन केंद्र सरकार आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारमधील वाद शिगेला पोहचला आहे. तामिळनाडू सरकारने राज्‍यात त्रिभाषिक सूत्र लागू करण्यास नकार दिला आहे. यामुळे केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियान (SSA) अंतर्गत ५७३ कोटी रुपयांची केंद्रीय मदत थांबवली आहे. ‘एसएसए’ निधी मिळविण्यासाठी राज्यांना एनईपी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. निधी थांबविल्यामुळे तामिळनाडूचे मुख्‍यमंत्री स्टॅलिन हे केंद्र सरकारावर चौफेर टीका करत आहे.

एक राष्ट्र एक निवडणूक, एक संस्कृती आणि धर्म ही संकल्पना लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाकडून आम्हा दोघांना धोका आहे. फॅसिस्ट भाजपापासून आपली भाषा, संस्कृती आणि साहित्याचे आपल्याला रक्षण करायचे आहे. तामिळनाडूतील द्रविड राजकीय चळवळीसाठी साहित्य आणि भाषा हे दीर्घकाळ आपले आधारस्तंभ ठरले आहेत. दृढ भाषिक आणि सांस्कृतिक अभिमानाची ती ओळख बनली आहे, असे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी यापूर्वीच म्हटले आहे.

रुपया (₹) चिन्ह उदय कुमार धर्मलिंगम यांनी डिझाइन केले होते. ते शिक्षणतज्ज्ञ आणि डिझायनर आहे. पाच शॉर्टलिस्ट केलेल्या चिन्हांमधून केंद्र सरकारने रुपयाचे चिन्‍ह म्‍हणून (₹) निवडले होते. भारत सरकारने १५ जुलै २०१० रोजी अधिकृतपणे हे चिन्ह स्वीकारले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...