Wednesday, June 10, 2026
HomeनगरSangamner : संगमनेरकर जनतेने दिलेला कौल मान्य- आ. खताळ

Sangamner : संगमनेरकर जनतेने दिलेला कौल मान्य- आ. खताळ

शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची दिली ग्वाही

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संगमनेरकर जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारत असून शहर विकासाकरीता महायुती सरकारच्या माध्यमातून कटिबध्द राहण्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर नगरपरिषद या निवडणुकीत शिवसेना-महायुतीच्यावतीने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देत, तळागाळातील कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

- Advertisement -

महायुतीचे सर्व उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या उमेदवारांनी धनशक्तीच्या आणि दडपशाहीच्या विरोधात चांगली लढत दिली. निवडणुकीचा निकाल जरी अपेक्षेप्रमाणे लागला नसला, तरी आमचे मनोबल कधीही खचणार नाही. माझ्यासारख्या एका सामान्य शेतकर्‍याच्या मुलाला या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली. त्या विश्वासातूनच शहर आणि तालुक्याच्या विकासाची अनेक कामे मार्गी लागली असून पुढील काळातही विकासाची गती कायम राहील, असे ते म्हणाले.

राजकारणात जय पराजय होत असतो, मात्र निकालानंतर निराश न होता शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना पुन्हा नवचैतन्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक ही पूर्णतः कार्यकर्त्यांच्या जीवावर लढविण्यात आली असून, पक्षस्तरावर निकालाचे आत्मपरीक्षण निश्चितपणे केले जाईल, असेही आमदार खताळ म्हणाले.

या निवडणुकी दरम्यान शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शिवसेना-भाजप महायुती आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील. प्रचारात कोणतीही कमतरता राहिली नाही, मात्र स्थानिक पातळीवर धनशक्ती, विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली आहे. तसेच या निवडणुकीत दादागिरी व दबावतंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात झाला हे सूज्ञ मतदारांनी पाहिले असल्याचेही नमूद केले.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Darshan Scam : मुक्काम कारागृहातच! कडलगांना सातव्या सुनावणीनंतरही दिलासा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांना व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आणि मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम...