Saturday, November 23, 2024
Homeनगरराज्यात सर्व 288 जागा लढविणार - आ. बच्चू कडू

राज्यात सर्व 288 जागा लढविणार – आ. बच्चू कडू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

ज्यांनी शेतकरी, मजूर, कष्टकरी लोकांना त्रास दिला. त्यांचा आम्ही वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा महायुती सरकार व महाविकास आघाडीला आमदार बच्चू कडू यांनी दिला. श्रीरामपूर येथे शेतकरी आंदोलन प्रकरणी आ.कडू यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने कडू हे कोर्टात नेहमीप्रमाणे हजर झाले होते. त्यावेळी कडू यांनी पत्रकाराशी संवाद साधला. ते म्हणाले की, ज्यांनी काद्याला भाव दिलेला नाहीत ते गप्प का आहेत? सगळ्याना आडवे करू, मी सत्ता असो की, नसो सत्तासाठी सुद्धा आमची लाचारी नाही.

- Advertisement -

विशेष त्यालाच काहीही महत्व देखील देत नाही. आम्ही विधानसभेच्या सर्वच 288 जागा लढविणार असल्याचे आ.कडू यांनी यावेळी सांगितले. ते सहा पक्ष एकत्र लढविणार असतील त्यातील चार पक्ष आमच्याकडे येतील असा दावा आ.बच्चू कडू यांनी केला. खासदार संजय राऊत नेहमी अभ्यास न करता वक्तव्य करतात. पोरासारख बोलण राऊत यांना शोभत नाही. राऊत यांनी सांभाळून बोलाव असा सल्ला ही कडू यांनी दिला.

तिसर्‍या पर्याय राज्यात सुरु झालेला असल्याने मनोज जरांगे, प्रकाश आंबडेकर तिसर्‍या आघाडीकडे येतील. केद्रांत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता होती. स्वामीनाथन आयोगाची शिफारस तुम्ही का मान्य केली नाही. राज्य ही तुमच्या हाती होते. मुस्लीम समाजाला आरक्षण दिले नाहीत फक्त मुस्लीम समाजाचे मतं घेता आले. भाजप काय? व काँग्रेस काय दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहे. त्यात काही वेगळे नसल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या