संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी शेतकर्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने मदत करावी. राज्यात महिलांवरील अत्याचार व दूषित झालेले वातावरण कमी होऊन राज्यातील संकटे दूर होऊ दे. तसेच देशभरात बंधुभाव वाढीस लागून हा देश समर्थपणे चालावा, अशी प्रार्थना काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
संगमनेरातील सुदर्शन निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना झाल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी कांचन थोरात, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, कर्करोगतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन आदी उपस्थित होते. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे, धरणे भरली आहेत काही ठिकाणी पावसाने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना सरकारने तातडीने मदत केली पाहिजे. राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार वाढले आहे. भेदभाव वाढतो आहे हे अत्यंत काळजीचे आहे.
राज्यावरील ही सर्व संकटे दूर होऊन सर्वत्र बंधुभाव वाढीस लागला पाहिजे. सर्वांना आपुलकीने वागवले गेले पाहिजे. देशातील बंधुभाव आणि चांगले वातावरण टिकून भारत देश समर्थपणे पुढे जावा आणि या चांगल्या वातावरणाचे जगाने अनुकरण करावे, असा आपला देश निर्माण व्हावा अशी प्रार्थना आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. डॉ. जयश्री थोरात यांनी यावर्षी पाऊस चांगला असल्याने सर्व नागरिक आनंदी आहेत. हे वातावरण असेच राहू दे असे सांगताना सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.