Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBhaskar Jadhav : "संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती, पण..."; आमदार भास्कर जाधवांचे...

Bhaskar Jadhav : “संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती, पण…”; आमदार भास्कर जाधवांचे नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण

मुंबई | Mumbai

कोकणातील ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे पक्षात नाराज असून ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या होत्या. तसेच ‘मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही’, असे विधान देखील भास्कर जाधव यांनी केले होते. यानंतर आता सुरू झालेल्या या चर्चांवर भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) म्हणाले की,”मी माझ्या गेल्या ४३ वर्षात क्षमतेप्रमाणे पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, असा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कोणत्या नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही. हे केवळ माझ्याच वाट्याला आलं असा भाग नाही. हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं. हे माझं दुर्देव आहे. हा दोष मी माझा माझ्याकडे घेतला.आपले सहकारी आपल्यासोबत राहिले पाहिजेत याकरिता आपण प्रयत्न केला पाहिजे ही भूमिक मी मांडली,” असे त्यांनी म्हटले. .

पुढे ते म्हणाले की,”ज्याला जायचं त्याने जा असं पक्षप्रमुख बोलले हा त्यांचा हक्का आहे. जर त्याला थांबवून तो थांबत नसेल तर पक्षप्रमुखांनी भूमिका घेणं योग्य आहे याचं समर्थन केलं. पक्षप्रमुख (Party Leader) बोलतात म्हणून आम्ही बोलावं हे योग्य नाही. मी पक्ष सोडून जाणाऱ्यांकरिता दोन ऐतिहासिक दाखले दिले होते. नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले तेव्हा सूर्याजी मालुसरे यांनी मावळ्यांची वाट अडवत तिथल्या कड्याचा दोर कापत मावळ्यांना लढा किंवा मरा असं सांगितलं. तेव्हा मावळे लढले आणि जिंकले. संभाव्य गेलेल्याचं काय होईल यासाठी आणखी एक उदाहरण म्हणजे विजापूरचा किल्ला, या किल्ल्याभोवती जे खंदर खंदलेलं होतं, त्यामध्ये पाणी होतं ते शत्रूचे सैनिक चढाई करायला यायचे तेव्हा त्या खंदकामध्ये पडून मरायचे. राजकारणीची अशी स्थिती आहे की कोणालाही कोणचीही गरज राहिलेली नाही, हा मुद्दा मी मांडला होता. मात्र हे मुद्दे नजरेआड झाल्याचे भास्कर जाधवांनी म्हटले.

तसेच पद मिळवण्यासाठी असे विधान करून राजकीय (Political) स्टंटबाजी केली जात असल्याच्या टीकेवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “गेल्या ४३ वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरिता, पद मिळवण्याकरिता मी कधी नौटंकी केली नाही. मी कधी नाटकबाजी केली नाही, रडगाणं गात बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळालं तर माझ्या नशिबाने, नाही मिळालं तर माझ्या नशिबाने, म्हणून हे मी विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याकरिता हे सगळं करतोय, पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार याासाठी वातावरण तयार करतोय, मा‍झ्या आयुष्यात असली नौटंकी कधी केली नाही. माझ्या आयुष्यातील किती राजकीय वर्ष राहिली? जे मी त्या काळात केलं नाही, आता कशाला करेल? हे मी पद मिळवण्याकरिता करतोय हा माझ्या मनाला लागलेला विषय आहे,” असेही भास्कर जाधव म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...